कोविड-१९ दरम्यान करावयाचे श्वासोच्छवासाचे व्यायाम

Query Form

श्वसनाचे व्यायाम फुफ्फुसांना बळकट करण्यास मदत करू शकतात आणि तुमच्या श्वसनसंस्थेवरील कोविड-१९ संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. खाली नमूद केलेले श्वसनाचे व्यायाम, महामारीच्या काळात तुम्हाला जाणवत असलेला तणाव कमी करण्यास देखील साहाय्य करू शकतात.

स्व-जागृत पालथे झोपणे :

  1. ३० मिनिटे ते २ तास: पोटावर झोपा. जर रुग्ण ऑक्सिजनवर असेल, तर या स्थितीत ऑक्सिजन काढू नये, डोके डाव्या/उजव्या बाजूला वळवावे आणि ऑक्सिजनचा आधार सुरू ठेवावा. आधारासाठी डोके, छाती आणि ओटीपोटाखाली उशा ठेवाव्यात, परंतु पोटावर दाब देऊ नये.
  2. ३० मिनिटे ते २ तास: डाव्या कुशीवर झोपणे
  3. ३० मिनिटे ते २ तास: बसून राहणे
  4. ३० मिनिटे ते २ तास: डाव्या कुशीवर झोपणे
  5. मग पुन्हा पहिल्या स्थितीत जा: पोटावर झोपणे.

प्राणायाम - पर्यायी नाकपुडी श्वास :

  1. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या – ४ मोजण्यांपर्यंत.
  2. डावी नाकपुडीसुद्धा बंद करा आणि १६ अंक मोजेपर्यंत श्वास रोखून धरा.
  3. उजवी नाकपुडी मोकळी सोडा आणि ८ मोजेपर्यंत त्यातून पूर्णपणे श्वास बाहेर सोडा.
  4. डावी नाकपुडी बंद ठेवून, ४ मोजेपर्यंत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या.
  5. दोन्ही नाकपुड्या बंद करा आणि १६ अंक मोजेपर्यंत श्वास रोखून धरा.
  6. डावी नाकपुडी मोकळी सोडा आणि ८ मोजेपर्यंत श्वास बाहेर सोडा.
Dr. Vikas Deswal
परत वर जा
×

कॉल बॅकची विनंती करा



× अस्वीकरण प्रतिमा